अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन

अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा  20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन

(स्त्रीशक्ती)

भोसरी:महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे. 

भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून अजित गव्हाणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आगामी काळात त्यांच्याकडून या मतदारसंघात सुनियोजित काम होण्याचा विश्वास असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी सांगितले.

दरम्यान भोसरी मतदारसंघांमध्ये लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी गव्हाणे यांना दिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी केले आहे.