व्हिजन महाराष्ट्र २०२८” साठी उत्तर भारतीय समाज महायुतीसोबत :- सिने अभिनेता मनोज तिवारी
(स्त्रीशक्ती)
महायुतीच्या तीनही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन
पिंपरी : महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाज “व्हिजन महाराष्ट्र २०२८” साठी भाजपा महायुती सोबत असून, पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे महायुतीचे तीनही उमेदवारांना उत्तर भारतीय समाज भरघोस मतांनी विजयी करेल, असा विश्वास दिल्ली भाजप अध्यक्ष तथा खासदार मनोज तिवारी यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक २०२४ महायुतीचे चिंचवड विधानसभा अधिकृत उमेदवार शंकर जगताप, भोसरी विधानसभा महेश दादा लांडगे, पिंपरी विधानसभा अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ सिनेअभिनेता तथा खासदार मनोज तिवारी (दिल्ली भाजपा अध्यक्ष) यांची मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू ) काटे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश सदस्य माउली थोरात, महेश कुलकर्णी, मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तुषार हिंगे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, शीतल शिंदे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, उत्तर भारतीय प्रकोष्ट अध्यक्ष आकाश भारती आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रसंगी, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमाताई खापरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिनेअभिनेता तथा खासदार मनोज तिवारी यांचा सत्कार करण्यात आला.
भाजप-महायुती आहे, तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. असे म्हणत संकल्प पत्र २०२४ वर खासदार मनोज तिवारी यांनी सर्वांचे लक्ष्य केंद्रित केले. ते म्हणाले कि, महाराष्ट्र राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत 'व्हिजन महाराष्ट्र @2028' सादर करणार आहे. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य भाजपा साकार करणार आहे. लाडक्या बहिणींना दरमहा 2,100, म्हणजेच वर्षाला 25,200 देण्यात येतील. शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेतकरी सन्मान निधीत वाढ करून 12,000 ऐवजी 15,000 मिळणार असून, भाजप-महायुती अन्न सुरक्षा आणि हक्काचं घर देईल. वृद्ध पेन्शन धारकांचा सन्मान निधी महिन्याला 2100 म्हणजेच वर्षाला 25,200 चा आधार दिला जाईल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात मदत करेल. 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन देण्यात येईल. 25 लाख रोजगार निर्मितीचा महायुतीचा संकल्प आहे. ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळेल. अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 वेतन आणि विमा संरक्षण, वीज बिलात 30% कपात, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल. मेक इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिनटेक आणि AI ची राजधानी नागपूर, पुणे, नाशिक सारखी शहरे एयरोस्पेस हब बनतील. सोयबिनला प्रति क्विंटल किमान रु. 6000/- भाव देण्यात येईल. 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवून 500 बचतगटांसाठी 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून 10 लाख उद्योजक घडविण्यावर सरकार भर देणार असून, एससी, एसटी, ओबीसी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी महायुतीचे सरकार काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक भाजपा कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न (बापू ) काटे यांनी केले. सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले.
Comments (0)
Facebook Comments (0)