(स्त्रीशक्तीNEWS)चिंचवड- मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ थेरगावात “मशाल निष्ठावंत” पदयात्रा काढण्यात आली. थेरगावात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी थेरगावचे ग्रामदैवत बापूजीबुवा मंदिरात दर्शन घेतले. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रचार यात्रेला सुरुवात झाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषाने थेरगावचा परिसर दणाणून गेला होता. थेरगाव परिसरातील विविध भागात प्रचार दौऱ्यात मतदारांच्या गाठी-भेटी, लग्न समारंभ, प्रचार फेरीच्या माध्यमातून वाघेरे यांनी मतदारांशी मनसोक्त संवाद साधला.

या वेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक संपत पवार, नंदूशेठ बारणे, शिवसेना विभाग प्रमुख गणेश पाडूळे, दत्ता केदारी, प्रमोद शिंदे पाशाभाई पठाण, खैम शेख यांच्यासह ग्रामस्थ, जेष्ठ नागरिक, संघटनेचे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थेरगाव गावठाणासह पवारनगर, सोळा नंबर, संतोषनगर, गुजरनगर या भागातील व परिसरातील सोसायट्यांमध्ये “मशाल निष्ठावंत” पदयात्रा असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत काढण्यात आली. मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी, निष्ठावंताची शिवसेना म्हणून ओळख असलेल्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशाल चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×