मणिपूर हिंसाचार व बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या’ आरपीआय पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची मागणी.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी.

 (स्त्री शक्ती)

पिंपरी:दिनांक 24 जुलै : मणिपूर येथील हिंसाचार व बलात्कार प्रकरणातील सर्वच्या सर्व नराधम आरोपींना फाशी तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी, सभासद, पदाधिकारी तसेच समस्त कार्यकर्त्यांच्या वतीने मणिपूर येथील हिंसाचाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर

तसेच अशा अमानवी घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी आरपीआय (आ) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पोलीस आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या पत्रात नमूद केले आहे की केंद्र शासन पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्था यांनी देशभरातील नागरिकांच्या संतप्त भावनांचा विचार करावा आणि सदर घटनेतील गांभीर्य लक्षात घेता अशी घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशी घटना पुन्हा कुठेही घडू नये यासाठी सर्वांनी कटिबध्द राहणे गरजेचे आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी, सभासद, पदाधिकारी तसेच समस्त कार्यकर्त्यांच्या व पुन्हा एकदा आम्ही मणिपूर येथील अमानवी हिंसाचाराचा जाहीर निषेध व्यक्त करतो. व सर्व आरोपीना तात्काळ अटक करूम फाशीची शिक्षा द्यावी.

यावेळी आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष के. एम. बुक्तर, पश्चिम महाराष्ट्र सचिव रमेश चिमुरकर, शहर जनरल सेक्रेटरी बाळासाहेब रोकडे, शहर कार्यध्यक्ष लिंबराज कांबळे, शहर उपाध्यक्ष विलास कांबळे, शहर प्रवक्ता भारत बनसोडे, शहर उपाध्यक्ष रमेश गजरमल,
पिं. चिं. शहर सल्लागार विलास पाटील, शहर सचिव विक्रम कांबळे, मातंग आघाडी अध्यक्ष अश्विन खुडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सचिन देडे, सचिव शेषराव सूर्यवंशी, बलभीम सोनकांबळे, उपाध्यक्ष प्रमोद वाघमैतर, संजय वाघमारे, दिलीप साळवे, सिद्धार्थ गायकवाड व शहरातील इतर बहुसंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×