उसने दिलेले पैसे परत मागणाऱ्या इसमाचे अपहरण करुन खुन करुन मृतदेहाची ताम्हीणी घाटात विल्हेवाट लावणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखा युनिट ०२ व चिंचवड पोलीस स्टेशन पोलीसांनी केले जेरबंद

पिंपरी(स्त्री शक्ती)

जबरदस्तीने त्याच्याच ब्रेझा गाडी मधुन पळवून नेलेचा गुन्हा घडल्याने त्याबाबत चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर ३१५ / २०२३ भा नोंद होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना त्यातील एका आरोपी नारायण बापुराव इंगळे, रा. चिंचवडगाव, पुणे यास चिंचवड पोलीस स्टेशन कडील पथकाने ताब्यात घेतले असता. त्याचेकडे गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम व स्टाफने तसेच चिंचवड पोलीस स्टेशन यांनी तपास केला असता, नारायण इंगळे याने पंजाब सिंध बँकेत मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले. रणजित मेला सिंग वय ७० वर्षे, रा. ओरा कोटी, प्लॅट नं. सी-१ प्लॅट नं. ९०४ उबाळे नगर वाघोली, पुणे यांच्याकडुन ३० लाख रुपये इसने घेतले होते. ते पसे परत दे म्हणुन श्री. रणजित मेला सिंग यांनी नारायण इंगळे याच्याकडे सतत तगादा लावल्याने नारायण इंगळे यांना ते पैसे परत करायचे नसल्याने त्याने त्याचे मित्र १) राजेश नारायण पवार २) समाधान ज्ञानोबा म्हस्के दोघे रा. चिखली, पुणे यांना श्री. रणजित मेला सिंग यांचा खुन करण्यासाठी ४ लाख रुपयांची सुपारी दिली होती. नारायण इंगळे याने श्री. रणजित मेला सिंग यांना दि.१९/०४/२०२३ रोजी पैसे देतो म्हणुन बोलावुन घेवुन तिघांनी मिळुन त्यांचे अपहरण करुन खुन केला व त्यांच्या मृतदेहाची व गाडीची विल्हेवाट १) राजेश पवार २) समाधान म्हस्के यांनी लावली आहे. अशी माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट ०२ कडील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनिय बातमीदारा कडुन सदर गुन्हयातील आरोपी हे चिखली घरकुल परीसरात असलेबाबतची माहिती मिळाली असता. गुन्हे शाखा युनिट २ कडील स्टाफने वेशांतर करुन आरोपींचा घरकुल चिखली परीसरात शोध घेवून सापळा रचुन शिताफीने आरोपींना घरकुल चौक, चिखली परीसरातुन ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास केला असता आम्हांस काहि माहिती नाही. आम्ही नारायण इंगळे यांना ओळखत नाही. आम्हांला कशाला पकडले आम्हि काहि केली नाही असे बोलून ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले असता त्यांना गुन्हे शाखा युनिट २ कार्यालयात आणुन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींनी सागितले की, त्याचा मित्र नामे नारायण बापुराव इंगळे, रा. चिंचवडगाव, पुणे याने त्यांना ४ लाख रुपयाची सुपारी दिली असुन त्याबदल्यात श्री. रणजित मेला सिंग यास ठार मारुन त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची.

दि.१९/०४/२०२३ रोजी नारायण इंगळे यांनी त्याच्या चिंचवड येथिल राहत्या घरी श्री. रणजित मेला सिंग यांना पैसे देतो म्हणुन बोलावुन घेतले. ते घरी आल्यानंतर त्यांच्या सोबत बोलत असताना नारायण इंगळे व राजेश पवार यांनी मागुन येवुन. रणजित मेला सिंग यांचा दोरीने गळा आवळुन व समाधान म्हस्के याने चाकुने चार ते पाच वेळा भोकसुन ठार मारले. त्यांनतर त्याचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळुन बेडशिटमध्ये बांधुन श्री. रणजित सिंग यांच्या लाल रंगाच्या ब्रेझा गाडीत टाकुन राजेश पवार व समाधान म्हस्के यांनी त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ताम्हीणी घाटात धबधब्या जवळच्या नाल्यात टाकुन व गाडी माणगाव एम. आय. डी. सी. परीसरात सोडल्याची सांगितले. आरोपींनी मयत इसमाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेले ठीकाण व गाडी सोडल्याचे ठीकाण दाखवुन दिले त्याप्रमाणे पोलीसांनी मयत इसमाचा मृतदेह व गाडी ताब्यात घेतली असुन अधिक तपास चालू आहे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×