पिंपरी-चिंचवड मनपा इंग्रजी माध्यम शाळांना शासनाची परवानगी नाही?

पिंपरी : (स्त्री शक्ती)

( बोपखेल) पिंपरी चिंचवड मनपाने मोठा गाजा वाजा करीत आकांक्षा फाउंडेशन सोबत MOU अर्थात सामंजस्य करार करून पिंपरी, कासरवाडी, बोपखेल, काळेवाडी तसेच मोशी या ठिकाणी इंग्रजी माध्यम शाळा सुरू केले आहेत. या शाळांमधून जूनियर केजी ते इयत्ता नववी पर्यंत सुमारे 2702 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. पुढच्या वर्षीपासून इयत्ता दहावीचा वर्ग या शाळांमधून सुरू होणार असून बोर्डाचे फॉर्म या विद्यार्थ्यांना भरता येणार नाहीत. त्याचे कारण या शाळांना सरल क्रमांक मिळालेला नाही परिणामी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येत नसल्याचे पालकांनी सांगितले. आकांक्षा फाउंडेशन पिंपरी चिंचवड मनपाकडे व जिल्हा परिषदेकडे गेली 6-7 वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत आहे. परंतु या शाळांना शासनाकडून प्रथम मान्यता व शासन मान्यता अद्याप पर्यंत मिळालेली नाही. ही मान्यता घेऊन देण्याची जबाबदारी मनपाची असून अद्याप पर्यंत मान्यता मिळालेली नाही असे आकांक्षा फाउंडेशनच्या प्रतिनिधीने सांगितले. जर या शाळांना शासनाची मान्यता नसेल तर शाळा बोगस आहेत का असा प्रश्न निर्माण होतो आणि त्याचा अर्थ असाच की शासन मान्यता नाही म्हणजे ती शाळा बोगस आहे. खाजगी बोगस शाळांवर कारवाई करण्याचे जबाबदारी ही मनपाची आहे आणि मनपाच जर बोगस शाळा सुरू करणार असेल तर कारवाई नेमकी कोणी आणि कुणावर करायची हा प्रश्नही निर्माण होतो. सद्यस्थितीत मनपाने या शाळांना शासन परवानगी घेतली नाही याचा अर्थ या शाळा कागदोपत्री बोगस ठरत आहेत. मनपा अधिकारी पाठपुरावा सुरु असल्याचे सांगत आहेत. याबाबतच्या अडचणी विद्यार्थी पालकांनी आमदार बनसोडे यांच्यासमोर मांडल्या असता आ. बनसोडे यांनी पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण मंडळ व पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी तसेच आकांक्षा फाउंडेशन प्रतिनिधी व विद्यार्थी पालक प्रतिनिधी यांच्या समवेत शनिवार 22 जुलै रोजी एक बैठक आयोजित केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असल्याने वेळात वेळ काढून आमदारांनी विषयाचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे. या इंग्रजी माध्यम शाळांचा प्रश्न तात्काळ निकाली काढून विद्यार्थ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळून या शाळांना प्रथम व शासन मान्यता मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील तसेच कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.

गरज पडल्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दर्शनास हा विषय आणून दिला जाईल व शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेऊन विषय तात्काळ निकाली काढला जाईल असे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×