विविध विभागाच्या अधिस्वीकृती समितीमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या नऊ जणांचा समावेश

मुंबई : प्रसार माध्यमातील संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी गठीत केल्या जाणाऱ्या राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समितीवर राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींची निवड राज्य सरकारने केली आहे. यामध्ये राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विविध विभागीय समित्यांवर मराठी पत्रकार परिषदेच्या नऊ पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहे.

प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती देण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती नियम २००७ हे उक्त संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक १९ सप्टेंबर २००७ रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले आहेत. सदरहू नियमावलीनुसार राज्यातील प्रसारमाध्यमांशी संबंधित पात्र व्यक्तींना अधिस्वीकृती पत्रे देण्याकरीता राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती गठीत करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्य अधिस्वीकृती समितीवर २७ सदस्यांची व ९ विभागीय अधिस्वीकृती समित्यांवर ४५ सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेच्या पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात एस.एम.देशमुख (ज्येष्ठ पत्रकार, पुणे), विश्वस्त किरण नाईक (दैनिक महासत्ता), शरद पाबळे (दैनिक सकाळ, पुणे), शिवराज काटकर (दैनिक तरुण भारत, सांगली), जान्हवी पाटील (दैनिक पुढारी, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. तर, विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या दिपक केतके (मुंबई विभाग), अनिल महाजन (औरंगाबाद विभाग), विजयकुमार जोशी (लातुर विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), विजयसिंह होलम (नाशिक विभाग), गजानन नाईक (कोल्हापूर विभाग), राजेंद्र काळे (अमरावती विभाग), अविनाश भांडेकर (नागपूर विभाग), हरिष पाटणे (पुणे विभाग) या नऊ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, राज्य अधिस्वीकृती समितीवर इलेक्ट्रॉनिक माध्यम विभागात विनोद जगदाळे व राजेश माळकर यांची नियुक्ती करण्यात आलीय.

अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्या सर्वांचे मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पदाधिकारी, सभासद यांनी अभिनंदन केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×