निगडी-(प्रतिनिधी) रविवारी दिनांक ११ जूनला

पोलीस मित्र नागरिक दक्षता संघ आणि दि. महापौर मधुकर पवळे प्रतिष्ठान, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखीच्या बरोबर जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार एक दिवसीय शिबीराचेआयोजन करण्यात आले. त्यामध्ये डॉक्टर अभिनंदन कुमठेकर, डॉ. उमेश पोरे, डॉ. शिवशंकर दिवाण, डॉ.सौरभ शिराळकर यांनी आरोग्य सेवा दिली. यावेळी दिंडींना मोफत औषध वाटपही करण्यात आले.

मा.नगरसेविका श्रीमती सुमनताई पवळे, ओंकार पवळे यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, पवनेचा प्रवाह चे संपादक श्री. शिवाजीराव शिर्के, कराड टाईम्स चे निवासी संपादक ज्येष्ठ कवी श्री. बाबू डिसोजा, अ़ॅड.रमेश अण्णा उमरगे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मनोहर दिवाण, ज्येष्ठ परिचारिका लेखिका सौ. माधुरी वैद्य डिसोजा यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेचे सदस्य सर्वश्री महालिंग चिवटे, सुनील चौगुले, राम सपाटे, बालगुडे, जय शिरसी यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबीर यशस्वी केले.

पिंपरी चे पोलीस निरीक्षक श्री. संदीप जाधव यांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे शिबीरास भेट देऊन कौतुक केले.

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×