Ratan Tata Death: रतन टाटांचा वारसदार कोण असणार? टाटा घराण्यातील तिघांची नावं चर्चेत, सर्वात पुढं कुणाचं नाव?
मुंबई: देशातील उद्योगविश्वाचे शिल्पकार आणि टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांचं बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) रात्री निधन झालं. रतन टाटा यांचं वय 86 वर्ष होतं. रतन टाटा यांनी उद्योगविश्वासह देशभरात सामाजिक उपक्रमांना हातभार लावला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रातील कामासाठी रतन टाटांनी मदत केली. रतन टाटा यांनी लग्न केलं नव्हतं रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या टाटा सन्सचा वारसरदार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भातील चर्चा सुरु आहेत.
रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या उद्योगांची जबाबदारी कोणाकडे येणार हे जाणून घेण्यासाठी टाटांच्या कुटुंबाविषयी माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. रतन टाटा यांच्या वडिलांचं नाव नवल टाटा तर आईचं नाव सोनी टाटा होतं. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केलं. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. रतन टाटा यांचे ते सावत्र भाऊ आहेत. त्यामुळं रतन टाटा यांचं साम्राज्य नोएल टाटा यांच्या नातेवाईकांकडे जाण्याची शक्यता आहे. नोएल टाटा यांना तीन मुलं असून त्यांची नावं माया, नेविल लिआ टाटा अशी आहेत.
Comments (0)
Facebook Comments (0)