प्राचीन महादेव मंदिरात सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्यात नाना काटे यांच्या पुराव्याला यश

प्राचीन महादेव मंदिरात सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसवण्यात नाना काटे यांच्या पुराव्याला यश

(स्त्रीशक्ती)

पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या लगत प्राचीन महादेव मंदिर आहे सुरक्षेचा दृष्टीने तेथे महापालिकेच्या वतीने सीमाभिंत बांधण्यात आलेली आहे

मा.विरोधीपक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी या सीमाभिंतीचा कामाचावेळी पहाणी करताना संबंधित मनपा अधिकारी व सल्लागार, ठेकेदार यांना या भितीवर सुशोभिकरण करण्याऐवजी प्राचीन महादेव मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात तसेच महाशिवरात्री निमित्त मोठा उत्सव येथे भरतो, महाशिवरात्री निमित्त दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मंदिरात येथे येत असतात,

 

त्यामुळे या प्राचीन महादेव मंदिर परिसरास शोभेल असे या सीमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्यात यावे अशा सूचना केल्या होत्या, या कामासाठी नाना काटे यांनी वेळोवेळी महापालिका यांच्याकडे पाठपुरावा केला होता त्यास यश म्हणून या सिमाभिंतीवर १२ जोतीर्लिंग शिल्प बसविण्याचा कामास सुरुवात करण्यात आली असून महाशिवरात्री उत्सवापूर्वी हे शिल्प बसविण्याचे काम पूर्ण होईल असे मनपा अधिकारी ठेकेदार यांचा वतीने सांगण्यात आले आहे.